टी. बी. खिलारे - लेख सूची

अमेरिकेचे दहशतवादाविरुद्धचे ‘प्रत्युत्तर’ चुकीचे का होते

मूळ लेखक: पी. साईनाथ मुंबईमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १८०हून अधिक लोक ठार झाल्यानंतर दहशतवादाला रोखण्यासाठी जे अनेक प्रकारचे युक्तिवाद केले जात आहेत, त्यांपैकी सर्वांत चुकीचा व घातक युक्तिवाद आहे तो असाः अशा प्रकारच्या दहशतवादास कसे प्रत्युत्तर (response) द्यायचे याचे धडे अमेरिकेकडून भारताने घेतले पाहिजेत. “जरा अमेरिकेकडे पहा- सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेत एकही दहशतवादी हल्ला झाला का?” …

जात-आरक्षण-विशेषांकाची आवरसावर

‘जात-आरक्षण’ विशेषांकासाठी १७० पानांचे साहित्य वाचकांना दिले गेलेले होते. यामध्ये मराठी पुस्तकांतून व वर्तमानपत्रातून व इंटरनेटवरून मिळणार नाही अशा माहितीचा समावेश केलेला होता. सडेतोड युक्तिवादासाठी जातिव्यवस्थेचा व आरक्षणाचा इतिहास व सध्याची जातिनिहाय वस्तुस्थिती आकडेवारीसह मांडलेली होती. नामवंत अभ्यासकांचे (उदा. सुखदेव थोरात, आनंद तेलतुम्बडे, गोपाळ गुरु इ.) लेखही देण्यात आलेले होते. त्यामुळे वाचकांचे बरेचसे गैरसमज अथवा …

(घ) सेमिनार मासिकाचे आरक्षण व दलित विशेषांक

कोणताही एक विषय खोलात जाणून समजावून घ्यायचा असेल तर अशा विषयावर वेगवेगळ्या अभ्यासकांची (scholars) व त्या त्या विषयातील तज्ज्ञांची मते एकत्र मांडून चर्चा केली जाते. सेमिनार हे दिल्लीहून प्रकाशित होणारे असेच एक मासिक आहे जे दर महिन्याला एक विषय ठरवून तज्ज्ञांचे लेख एकत्र प्रसिद्ध करत असते. जात-आरक्षणाच्या संदर्भात या मासिकाने एकूण चार विषयांवर चर्चासत्रे घडवली …

क्रीमी लेयर (उन्नत व प्रगत व्यक्तीला वगळणे)

१९९२ साली सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना आरक्षण चालू ठेवण्यास मान्यता दिली, परंतु क्रीमी लेयरची अट घालून. आठ न्यायाधीशांच्या निकालामध्ये तीन वेगवेगळे मतप्रवाह होते. एक अपवाद सोडून बहुतेकांनी क्रीमी लेयरचा निकष ओबीसींमधील प्रगत व्यक्तींना लावायला अनुकूलता दर्शविली होती. न्यायाधीश पी.बी. सावंत व पांड्यन यांनी तर्कसंगत व विवेकी मत मांडले होते ते असेः i) केवळ आर्थिक निकष लावून …

भेदभाव व आरक्षण जागतिक स्थिती

जात, धर्म, वंश, रंग व राष्ट्रीयत्व या गोष्टींवर आधारित एका सामाजिक गटाचे शोषण करणे व त्यांना निष्ठुरपणे वागवणे ह्या गोष्टी जगातील अनेक देशांत अस्तित्वात आहेत. आजही अनेक देशांमध्ये काही जमातींना हीनपणाने वागवून त्यांची सामाजिकदृष्ट्या नागवणूक केली जाते, त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते. परंतु त्याचबरोबर अनेक देशांनी ह्या जमातींच्या विकास व उत्थापनासाठी आरक्षणाच्या, भेदभाव नष्ट करण्याच्या …

दलित-आदिवासी आणि पुढारलेल्या जाती यांच्यातील विषमताः काही आकडेवारी

हजारो वर्षे उच्च जातीच्या अत्याचार-अन्यायाला बळी पडलेल्या दलित आदिवासींची स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे झाल्यानंतर व शैक्षणिक आणि केवळ सरकारी नोकरीत आरक्षण लागू केल्यानंतर आज पुढारलेल्या जातीच्या तुलनेत स्थिती काय आहे हे शासनाने वेळोवेळी सर्वेक्षण करून जमा केलेल्या माहितीतून, तसेच अभ्यासकांनी व स्वयंसेवी संस्थांनी जमा केलेल्या पाहणीतून व त्यांच्या आकडेवारीतून कळून येईल. दलित-आदिवासी यांचे शैक्षणिक, सामाजिक व …

करुणानिधी आणि रॅशनॅलिझम

रॅशनॅलिझमचा कडवा पुरस्कार करणारे व त्याप्रमाणे वागणारे तामिळनाडूचे मुख्यमंत्री मुभूवेल करुणानिधी ह्यांनी सत्यसाईबाबाला आपल्या घरी बोलावून व त्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून rationalism च्या तत्त्वांला तिलांजली दिली, रॅशनॅलिझमच्या तत्त्वांचा करुणानिधींनी आयुष्यभर पुरस्कार केला व डीएमके पक्षासाठी आपल्या कार्यकर्त्यांनाही त्या तत्त्वानुसार आचरण करायला भाग पाडले. आयुष्यभर लोकांसमोर ते नास्तिक व एक कडवे रीिंळेपरश्रळीीं म्हणून आले. त्यापूर्वी एकदा …

मानवी इतिहासातील सर्वांत घातक शोध – शेती

मानवी इतिहासात डोकावून पाहिल्यास आजच्या सतत वाढत जाणाऱ्या गोंगाटाच्या व गोंधळाच्या सामाजिक स्थितीस कीड लागण्यास नेमकी कधीपासून व कोणत्या शोधापासून सुरुवात झाली, ह्याचे जर आपण तटस्थपणे चिंतन केले तर काय दिसते ? मोबाईल फोन्स्, दूरचित्रवाणी, जैविक अभियांत्रिकी आणि सुपरमार्केट्स ह्या सर्व गोष्टी आपल्याला एका मोठ्या आगीच्या ठिणग्या आहेत असे जाणवेल. मग मोठ्या आगीचे, सामाजिक नाशाच्या …

सायकल आणि कार (उत्तरार्ध)

आजच्या घडीला सायकलचा इतिहास व महत्त्व सांगण्याचे कारण म्हणजे कारचा वाढता खप, पेट्रोल-डिझेलच्या वाढत जाणाऱ्या किमती, त्यामुळे वाढत जाणारे प्रदूषण व वाहनांच्या गर्दीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या. १९ व्या शतकातील ऊर्जा समस्येवर घोड्याच्या शक्तीऐवजी मानवी शक्तीचा वापर करणाऱ्या सायकलचा शोध लागला तसे आज खनिज तेलाच्या समस्येवर पर्यायी ऊर्जा म्हणून बायो-डिझेल व हायड्रोजन यांचा वापर करता येईल …

सायकल आणि कार (पूर्वार्ध)

विल्यम वॅगस्टाफ ह्या ९१ वर्षीय माणसाचे नुकतेच लंडन येथे निधन झाले. मृत्यूपूर्वी त्याने आपली वैशिष्ट्यपूर्ण सायकल लंडन येथील ट्रान्सपोर्ट म्युझियमला भेट दिली. ह्या सायकलचे वैशिष्ट्य म्हणजे वॅगस्टाफने ती ७५ वर्षे वापरली. वयाच्या २० व्यावर्षी बचत करून १९२९ साली ही सायकल त्याने विकत घेतली होती. केवळ शेवटची दोन वर्षे आजारी असल्यामुळे सायकलचा वापर त्याला करता आला …

नैतिक बुद्धिमत्ता

सर्व पालकांना वाटते की आपली मुले आज्ञाधारक असावीत. त्यांना सिगरेट, दारू, अमली पदार्थ यांचे व्यसन असू नये. त्यांनी बाहेर मारामारी किंवा दंगेखोरपणा करू नये. त्यांनी नातेवाईकांशी व मोठ्यांशी आदराने वागावे. परंतु यासाठी नेमके काय करावे हे पालकांना समजत नाही. सदाचाराने कसे वागावे यासाठी कोणतेही नीतिनियम नाहीत. शाळेत मूल्यशिक्षणाचे पाठ गिरवून अनैतिक वर्तणुकीस आळा बसतोच असे …

पीटर सिंगर यांच्या लेखाविषयी

‘सर्व प्राणी समान आहेत’ हा पीटर सिंगर यांचा दि. य. देशपांडे यांनी अनुवादित केलेला लेख वाचला. (आ.सु. जून 2003) आपणाला पटणाऱ्या विचारांचाच अनुवाद अनुवादक करीत असतो, असे मी गृहीत धरतो. लेख वाचून पहिला प्रश्न मनात उद्भवला तो म्हणजे, ‘मुळात मानवजात मानवाशी तरी माणुसकीने वागण्या- इतपत प्रगत झालेली आहे का?’ तसे असते तर संहारक शस्त्रास्त्रांची निर्मिती …

सत्य जाणण्याचे विज्ञानाहून अन्य मार्ग आहेत काय?

विज्ञान आपल्याला सत्य सांगते का? विज्ञान आणि विज्ञान नसलेल्या गोष्टी यातील फरक कसा सांगता येईल? जर वैज्ञानिकांच्या एका गटाने आपणाला जैविक प्रक्रिया केलेले अन्न (genetically modified foods) धोकादायक नसते असे सांगितले, व दुसऱ्या वैज्ञानिकांच्या गटाने सांगितले की असे अन्न धोकादायक असते; तर कोणावर विश्वास ठेवायचा? या प्र नांची उत्तरे देण्यासाठी आपणाला वैज्ञानिक एखाद्या निष्कर्षाप्रत कसे …

पुस्तक-परीक्षण- ‘ज्याचा त्याचा प्रश्न’

‘देव’ ही आजची ज्वलंत समस्या आहे हे जाणून त्या समस्येवर घणाघाती प्रहार करणारे, प्रेक्षकांना विचार करायला लावणारे ‘ज्याचा त्याचा प्रश्न हे नाटक रंगभूमीवर आले आहे. प्रेक्षकातील कुठल्या ना कुठल्या प्रवृत्तीच्या द्योतक असलेल्या चार प्रमुख व्यक्तिरेखा नाटकात आहेत. या व्यक्तिरेखांच्या मनातले विचार हे प्रेक्षकांपैकी कुणाचेही असू शकतात. त्यातील एक व्यक्तिरेखा म्हणजे जास्त कर्मकांडात रमून न जाता …

परिणामशून्य होमिऑपथी

१८ व्या शतकाच्या शेवटी सॅम्युएल हानेमान या जर्मन डॉक्टरने होमिऑपथीचे मूळ तत्त्व सुलभ रूपात मांडण्यास सुरुवात केली. त्याच्या काळातील प्रचलित वैद्यकीय उपचारपद्धतीमध्ये जळवा लावणे, कोठा साफ करणे व इतर उपचार यांनी लाभ होण्याऐवजी हानीच जास्त व्हायची. हे पाहून खरे तर हानेमान व्यथित झाले होते. मयुरी क्लोराईडसारख्या औषधामुळे होणार्‍या विषबाधेची त्यांना चिंता वाटत असे. त्यांनी नंतर …